Sunday, February 22, 2015

स्फींक्स..

स्फींक्स..

मी आहे स्फींक्स
एखाद्या शापीत गंधर्वासारखा
एकाच जागी खीळलेला
प्रश्न विचारुन सतावणारा
मला हवा असलेला
वाटसरु अजुन आलाच नाही
येणार्या कुठल्याही वाटसरुला
प्रश्न विचारावा असे वाटत नाही
दुरुन तर सगळेच चेहरे
ओळखीचे दिसतात
हवेहवेसे वाटतात
जवळ आल्यावर कळत
की फसगत झालीय
चेहरा आहे पण
आपला वाटसरु त्यान नाहीय
त्याला यायचेच नाही ?
का रस्त्यातच तो गुंतुन पडलाय ?
दोस्त बनुन येणार?
का शत्रुसारखा घाव घालणार?
प्रश्न तर तयारच आहेत
पण उत्तर देणारा अजुन येत नाहीय
परिस्थीतीच्या वाळुची
वादळे उठत आहेत
कणाकणाने मला झीजवत आहेत
कदाचित तो येइल
तेंव्हा मी झीजुन गेलेला असेन
भुतकाळातुनही वजा झाला असेन
आणी तोच प्रश्न विचारेल
इथला स्फींक्स कुठे गेला ?
वर्षानु वर्ष वाट पहाणारा कुठे गेला?
उत्तरे तर आहेत
प्रश्न विचारणारा कुठे गेला ?